मराठी घरांमध्ये न्याहारीला पोहे,  उपमा,  थालीपीठ ह्यांच्या बरोबर तांदळाची उकड आलटून पालटून असायचीच. आम्ही बरेचदा नाश्त्याला तर उकड करायचोच पण आजारपणात,  तोंडाची चव गेलेली असताना उकड हा खास 
मागणीजन्य पदार्थ.  मात्र आम्ही तयार उकड खाताना जोडीला तुपाऐवजी तेलाची धार घ्यायचो.