कविता छान छोटीशी भावूक आहे पण मनोगतावरील मराठी टंकलेखनाची सवय नसल्याने किंवा घाईघाईत पाठवल्याने अनेक दोष राहिले आहेत. आपली कविता अशी आहे का?
तुझे माझे नाते कसे
प्रेमाने चिंब भिजलेले
फुलांसारखे फुललेले
मातीच्या सुगंधासारखे कधीही
हवेहवेसे वाटणारे
मनातल्या भावना जाणणारे
सुखा-दुःखात हसणारे
एकमेकात हरवणारे
प्रणयात धुंद होणारे
आयुष्याच्या खडतर वाटेवर कायम साथ देणारे.........
मा. प्रशासक, आपल्याला योग्य वाटल्यास हा बदल कवितेत करून टाकणार का प्लीज?