आज भारताचे चांद्रयान चंद्रावर उतरल्याची घटना आनंदाची आहेच. किंबहुना आता भारता वैज्ञानिक दृष्टिकोण रुजायला आरंभ होणार ही आशाही पल्लवित झालेली होती.

पण ...

आजची बातमी वाचली आणि ह्या आनंदावर पाणी पडले. बातमी होती : चंद्रावर तिरंगा फडकला.

बातमी छोटीशीच आहे. थोडा जरी वैज्ञानिक विचार केला तरी ह्या वाक्याचे फोलपण लक्षात येईल. चंद्रावर वातावरण नसल्याने झेंडा फडकणे अशक्य आहे. असे असूनही चंद्रावर झेंडा फडकला अशी बातमी बालवयात कानावर पडली तर पुढे ते त्यांच्या मनातून काढायला जड जाईल अशी भीती वाटते.

पत्रकारांनी वैज्ञानिक विचारसरणीला घातक अशी बातमी देऊ नये अस मला वाटते.