मंजुषा, तुमचे लेख वाचले. आवडले.
तुमच्या साहसाचे, चिकाटीचे आणि वर्णनाचेही कौतुक वाटते.
युथ हॉस्टेल्सचे बोधवाक्य आहे "चरन् वै मधु विन्दन्ति" म्हणजे "ते संचार करून मध जमा करतात".
ते तुम्ही सार्थ ठरवले आहेत. मीही नागपूरचा आहे. शिवाय, युथ हॉस्टेल्सचा आजीव सभासदही आहे.
म्हणून मला तुमच्या उपक्रमाचे विशेष कौतुक वाटते.
प्रशासकांची सरकचित्रांची कल्पना उत्तमच आहे.
मात्र चित्रे जराशी संस्कारित करून चढवायला हवी होती असे वाटते.