श्रद्धा अंधश्रद्धांच्या या गडबडीत प्रसारमाध्यमे चुकीची माहिती देत आहेत त्याचे काय?
१) एका वर्तमानपत्राने लिहिले आहे की काल चांद्रयानापासून अलग होऊन चांद्रभूमीवर आदळलेले प्रोब छायाचित्रे पाठवण्यास सुरूवात करेल. प्रत्यक्षात त्याचे आयुष्य २० मिनिटांचे होते आणि ते आदळल्यावर नष्ट झाले. त्याने २० मिनिटांच्या १००किमी प्रवासात छायाचित्रे पाठवली.
२) अनेक वाहिन्यांनी आणि वर्तमानपत्रांनी लिहिले आहे की चंद्राची एक बाजू कायम अंधारात असते आणि भारताचे चांद्रयान त्या भागाचा अभ्यास करणार आहे. वास्तविक चंद्राची एकच बाजू कायम "पृथ्वी समोर " असते. पलिकडील बाजू आपणास त्यामुळे दिसत नाही. याचा अर्थ दुसऱ्या बाजूवर सूर्यप्रकाश पडत नाही असे नाही. पौर्णिमेला आपल्याला नेहमी दिसणारी बाजू सूर्यप्रकाशाने उजळलेली असते तर अमावस्येला चंद्राची हीच बाजू अंधारात असते व पलिकडील बाजू (आपल्याला कधीही न दिसणारी) सूर्य प्रकाशित असते.