पंजाबी, विशेषतः सरदारजी, सपोर्टचा स्पोर्ट आणि स्पोर्टचा इस्पोर्ट असा उच्चार करतात. इकठ्ठे ला ते कठ्ठे म्हणतात. स्कूलला सकूल आणि स्टोव्हला सटोव. सामानला  स्मान आणि मालाडला ते म्लाड म्हणतात.  स्त्रीला इस्त्री म्हणत असले तरी जेव्हा त्यांना इस्त्री म्हणायचे असते तेव्हा इसत्री म्हणतात. ते कशाला काय म्हणतात ते संवयीने समजू लागते.