आपण चंद्रापर्यंत यशस्वीपणे पोहोचत आहोत ह्याचा अभिमान आहे पण दुसरीकडे कोकणात जाताना 
घाटातून जाताना वाटते की चंद्रापर्यंत योग्यपणे यान पोहोचवणे हे जसे शास्त्रज्ञांचे कौशल्य आहे तसेच 
आमच्या गावापर्यंत सुखरुप एस्टी पोहोचवणे हे पण एस्टी चालकाचे अगदी तोडीस तोड प्रावीण्य आहे.

हल्ली जर मला कोणी विचारले की काय नवल-विशेष?  मी म्हणते की हल्ली जगणे हेच नवल आहे आणि 
समाधानाने,  दुसऱ्याला त्रास न देता आयुष्य घालविणे हे विशेष आहे.