ईंग्रजानी या देशावर राज्य केले. त्यानी या देशाला खरेखुरे परावलंबी केले. कारण भारताचा सर्वात जुलमी शासक औरंगजेब सुद्द्धा
शेतसारा हा चौथाई (१/४) च्या प्रमाणात वसुल करित होता. बाकिचे ३/४ सारा हि ग्रामपंचायत स्वतः कडे ठेउन ग्रामविकासाचे कार्य ज्यात
पाणी पुरवठा, बांध बंधारे, मल निःसारण, शाळा, धर्मशाळा, स्थानिक बाजारपेठ, रस्ते आदिंचा विकास इ. कामांच समावेश होता.
राजधानी मध्ये कोणिही राजा कसाही असो पण स्थानिक जनता खाउन पिउन सुखी होती कारण त्यंच्या सर्व गरजा त्यांच्या गावातच
पुर्ण होत असत.
भारतिय जनता वरवर पाहता राजकिय द्रुष्ट्या उदासीन दिसण्याचे हेही एक कारण असू शकेल पण जनता (९०% ग्रामिण) सुखिच होति.
पण ईंग्रजानी १००% सारा वसुली सुरू केली तेव्हा भारतिय जनतेने त्याना वरिल गोष्टी बद्दल विचारले तेव्हाः " सरकार तुमची काळजी घेइल" असे आश्वासन देण्यात आले त्यानुसार ग्रामसेवक व अन्य सरकारी नोकरपेशा वर्गाची निर्मिती करून जनतेस सरकार व राज्यशरण केले.
परिणामी आज आपल्या घरासमोरिल समस्ये साठी आपण बाहेर गावातिल आलेल्या सरकारी नोकरास जाब विचारतो. वास्तविक पाहता
आपली सामुदायिक जबाबदारी असे समजून आपण स्वतः त्या समस्ये कडे काणा डोळा करतो आणि सरकारी कामाचा जाहिर बभ्रा करतो.
आता परत फिरून जेव्हा ग्रामसभा आदी पद्धती द्वारे तसेच शासन लागू होउ घातले आहे.
आपण त्याकडे स्वागतशील द्रुष्टिकोणाने बघितले पाहिजे.
अखेर खंडप्राय एवढ्या मोठ्या देशाचे शासन कधिच एका राजाद्वारे झाले नाही हि ऐतिहासिक बाब आपण समजून घेतली पाहिजे. तरिही देशाची
एकात्मता अखंड होती आणि जनता खाउनपिउन सुखी होति.