हा प्रभावी इलाज नसून, हे रोग होऊ नयेत म्हणून ही घेण्याची काळजी आहे.

उसंडू झाला खरा. ते वाक्य हात साबणाने धुणे हा जुलाब व श्वसनसंबंधी रोग थांबविण्याचा
सर्वोत्तम आणि स्वस्त असा प्रभावी इलाज आहे
असे असायला हवे होते.
संदर्भ :  दुवा क्र. १ 

अवांतर : हा चर्चेचा विषय होऊ शकणे हे आपलं आणि आपल्या देशाचं मोठं दुर्दैवच
म्हणावं लागेल.
 

 दुर्दैव???? कसे काय? विज्ञानावरील चर्चेचा विषय कधीही दुर्दैवी कसा होऊ शकतो ते नीट विशद
करून सांगाल का?
 

 

तसे पाहायला गेले तर विकसित देशसुद्धा काही स्वच्छतावादी नव्हेत. डिस्नेसारख्या वाहिन्यांवर त्यांचे अनेक
दिवसांचे शिळे पिझ्झा खाणे. स्वत:च्या अंगावर फेकलेले केक आवडीने खाणे आणि इतर बरेच इथे उल्लेख न
करता येण्याजोग्या गोष्टी पाहून किळस येते. फरक इतकाच असेल की तिथे पण मुले आजारी पडत असतील
मात्र त्यांना वैद्यकीय सुविधा त्वरीत मिळत असतील. असे असताना बिचाऱ्या आपल्या भारत देशाचाच आपण
का बरे उल्लेख केला असावा?

आपला आक्षेप शौच ह्या शब्दास दिसतो. खुद्द आयुर्वेदात, पंचकर्मात वमन, बस्ती इ. द्वारे शरीरातील
अनावश्यक गोष्टी उत्सर्जित करण्यास फार मोठे महत्त्व दिले गेले आहे. योग्य रीतीने मलमुत्र विसर्जन हा
निरामय आयुष्याचा पाया मानला गेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे आयुर्वेदात ह्यावर अनेक ग्रंथ लिहिले गेलेले
आहेत, चर्चा केल्या गेलेल्या आहेत.

आता आपण भाषेच्या दृष्टिने जर शौच हा शब्द बघितला तर तो शौच हा शब्द शुचि ह्या शब्दावरून आला आहे
ज्याचा अर्थ स्वच्छ, पवित्र असा आहे.

कुठल्याही स्वच्छ आणि पवित्र अश्या अर्थी असलेल्या शब्दाला आपला आक्षेप का असावा?