दुसऱ्या शब्दात इथे स्वच्छतेची एकूणात परिस्थिती काय असेल याची कल्पनाच केलेली बरी.
इथेसुद्धा असे म्हणावयाचे आहे का? कारण ही विश्वव्यापी समस्या आहे. भारतापुरती मर्यादित नाही.
तसेच अगदी आपण म्हणता तशी मी कल्पना केली. समजा की भीषण दृश्य नजरेसमोर आले. कबुल आहे
की भारतात स्वच्छतेच्या प्राथमिक गोष्टींची जाण लोकांना नाही. पण त्यासाठी टीकेपेक्षा वेगळे असे
आपण काय करत आहात हे सांगावे ही विनम्र विनंती. लक्षात घ्या आपल्या देशाच्या दोषांकडे एक
बोट दाखवताना चार बोटे स्वत:कडे वळलेली आहेत.
देश म्हणजे सरकार नव्हे तर आपणच आहोत. देशाच्या परिवर्तनाची सुरुवात आपल्या योगदानापासून होते.
मी ह्या विषयावर एक लेख लिहिला अंदाजे २००+ जणांनी तो इथे व इतरत्र वाचला. तितकी लोक ह्याबाबतीत
साक्षर झाली. आपण आजपासून भारतातल्या रोज १ ह्याप्रमाणे ह्या महिन्यात किमान ३० जणांना
"जेवणापूर्वी हात का धुवावेत" ह्याबद्दल साक्षर कराल का?