पण माझा असा दावाच नाही की भारतात असे घडत नाही. माझे स्पष्ट
म्हणणे इतकेच की मिलिंद साहेबांनी फक्त भारतातच असे घडते असे मानू नये आणि
भारतावर टीका करण्यापूर्वी आपण आपला देश चांगला करण्यासाठी काय करीत
आहोत हे पण सांगावे. नाहीतर लोकांचा गैरसमज होईल की हे आरएनआय
(अभारतीय निवासी) आहेत. लोक म्हणतील की त्यापेक्षा एनआरआय चांगले.
बाकी ह्या कामात आपली पण त्यांना मदत झाली तर चांगलेच. देसी अभियांत्रिकीतून
आपण बाहेर येऊन आपण जर काही ठोस केलेत तर लोकांनाही बरे वाटेल.
नाहीतर ग्रामोफोनची पीन अडकल्यावर गाणे ऐकणे ही इतरांना शिक्षाच नाही
का?
बाकी आपली दुधाविषयीची काळजी पाहून आपण गवळ्यांना चांगले मार्गदर्शन
करू शकाल ह्यात शंकाच नाही. आजपासूनच सुरुवात करावी ही प्रार्थना.