सध्या आय. बी. एन लोकमत, स्टार माझा, झी चोवीस तास अशी तद्दन भिकार चॅनेल्स सुळसुळत आहेत.

भयंकर मराठीचे एका पेक्षा एक नमुने तिथे एकायला मिळतात.त्यामुळे जिथे चांगली मराठी टिकून आहे अश्या ठिकाणची मराठी भाषा बिघडण्यास मदत होइल.

"आता वळूयात इतर बातम्यांकडे" असे वाक्य बेमुर्वतपणे फेकणारे बातमीदाते,


" सोनल, मी सदया बॅंड्रामध्ये आहे, राजला घेउन पोलिस लोक ठान्यावरून निघालेले आहेत, ते आता कदीपण राजला मॅजिस्ट्रेट समोर पेश करणार, सोनल. " असे अर्धवटराव वार्ताहर


" वीकेंडसाठी लागतो तुम्हाला थोडा फंकी मूड, त्यासाठी आय. बी एन लोकमत ने आणले आहेत हटके वीकेंड डेस्टीनेशन्स"
अश्या भयंकर मराठी स्पीकिंग जर्नालिस्टांची टोळी हे सगळे चॅनेल्स पाळून आहेत.

 काकनजरी

(असभ्य आणि भडक वाटलेला मजकूर वगळला. मनोगतावर मजकूर लिहिताना वापरायची भाषा नेहमी सभ्य आणि सौम्य असेल असे पाहावे. : प्रशासक)