प्रतिसाद देणाऱ्या सगळ्यांचे मनापासून आभार. लोभ आहेच़; असाच राहू द्यावा.

बहुतेकांना 'मारवा' आवडला, हे वाचून खूपच आनंद झाला. माझ्या अनेक कवितांमधून या ना त्या कारणाने मारवा येतो. [(किंवा मी तो आणतो :) ]. याबाबतीत कधी कधी अतिरेक होतो की काय़; एकच कल्पना आपण थोडीफार बदलून सगळीकडे अधूनमधून वापरत आहोत की काय, असेही वाटून जाते. आपल्याच कल्पनांची आपणच चोरी करत आहोत, असाही एक विचार मनात तरळून जातो... पण काही काही मोहांपुढे हतबल होण्याशिवाय पर्यायच नसतो. मारवा हा त्यातलाच एक! :)

 सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद.