दुवा क्र. १ आणि दुवा क्र. २ हे दुवे उघडून वाचा. सरकारवर याच धूळफेकीच्या मुद्द्यांवर टीका करणारा अग्रलेख १९ नोव्हेंबरच्या पुणे सकाळमध्ये आहे, पण तो अग्रलेख इंटरनेटवर सापडला नाही. सकाळमध्ये आणखी एका बातमीत, ८० टक्के स्थानिकांना नोकऱ्या देण्याचा कायदा करण्याचा सरकारचा विचार नाही, फक्त संबंधितांना तशी विनंती करण्यात येणार आहे, असे सरकारी सूत्रातून मिळालेले निवेदन आहे. पण कुणी विनंतीला वाटाण्याच्या अक्षता दाखविल्या तर कोणतीही कारवाई करण्याचा सरकारचा इरादा नाही अशीही पुस्ती जोडली आहे. बरे, या नोकऱ्या सर्व क्षेत्रासाठी लागू नसून त्यांत अनेक अपवाद केलेले आहेत. या बातम्या आणि हा अग्रलेख ईसकाळवर सापडला तर जरूर वाचावा, मला सापडल्यावर मी 'दुवा' देईन.