शिवाय थोडे प्रश्नही पडले. मला सुचतील तेवढी उत्तरे देत आहे.
मेजवानीच्या पंक्तीत वाढप कोण करत असे? : हे काम घरातला स्त्रीवर्गच करायचा.
मागून जेवणाऱ्या त्या व्यक्तींची जेवणे कशी होत?: आधी जेवून घेतलेल्या मुलींनी त्यांना वाढायचे. स्वयंपाक शिजवतांना उपयोगात भांडी (पातेली, कढया वगैरे) कधीही वाढण्यासाठी घ्यायची नाहीत असा कायदा होता. आज स्त्रीमुक्तीचा उद्घोष करण्याच्या युगात ते बरोबर वाटणार नाही पण त्या काळातल्या बायकांना त्यात कांही वावगे वाटायचे नाही.
एखाद्या दिवशी नेहमीहून खूप अधिक खाणे म्हणजे मेजवानी का? : नाही, एकत्र बसून गोड धोड खाणे, सर्वांचे जेवण होईपर्यंत इतरांनी थांबून राहणे म्हणजे मेजवानी. त्यात एकमेकांना आग्रह करकरून जास्त खाऊ घातले जात असे. पानात कांही टाकून देणे असभ्यपणाचे मानले जात असल्यामुळे ते खावे लागत असे.