आधी जेवून घेतलेल्या मुलींनी त्यांना वाढायचे. स्वयंपाक शिजवतांना उपयोगात  भांडी (पातेली, कढया वगैरे) कधीही वाढण्यासाठी घ्यायची नाहीत असा कायदा होता. आज स्त्रीमुक्तीचा उद्घोष करण्याच्या युगात ते बरोबर वाटणार नाही पण त्या काळातल्या बायकांना त्यात कांही वावगे वाटायचे नाही.

मला नेहमी असे वाटते की स्वयंपाक करणाऱ्या स्त्रीवर्गाने आधी जेवून घ्यावे. एकतर स्वयंपकाच्या श्रमाने त्यांना भूक लागलेली असते आणि स्वयंपाक कसा झाला ते त्यांना फर्स्ट हॅण्ड कळेल हा ही फायदा आहे. मी अनेकवेळा हा प्रस्ताव आमच्या घरी प्रयेक सणावारी मांडला होता. (गृहखात्याकडून तो कधीच संमत झाला नाही  )

-श्री. सर. (दोन्ही)