भल्या मोठ्या फलकावर मराठीची एकही चूक नाही
मागे पुण्यात एक पेंटर पुराणिक फार प्रसिद्ध होते. त्यांच्याइतके प्रमाणबद्ध देवनागरी लेखन (अगदी लहान आकारमानापासून ते दोनमजली इमारतीएवढ्या भल्यामोठ्या आकारमानापर्यंत! ) मी आजवर दुसरीकडे कुठेही पाहिलेले नाही. शुद्धलेखनाबद्दल त्यांचा फार कटाक्ष असे सांगतात.