हसले होते निरोप घेऊन निघताना
बांध तरीपण फुटला मागे वळताना

सुंदर

हसते आता आठवून मी स्वतःशी
दिसायचा तू गोड किती घाबरताना

छान

सांगत होते तुझ्याच खोड्या उशीस मी
भास तुझा अन झाला कूस बदलताना 

वा

सांग कुठे या अश्रूंना मी लपवावे
अवचित येती गालावरती हसताना

उत्तम

काय खुशाली नभास या मी सांगावी 
काय इथे घडणार तरी तू नसताना

अप्रतिम. शेवटच्या ओळी खल्लास.... अल्पाक्षरी, सूचक आणि अतिशय प्रभावी शब्दरचना.

नेबमीप्रमाणेच अतिशय सुरेख कविता. अभिनंदन आणि धन्यवाद.