मराठीतले सगळ्यात जुने संकेतस्थळ मायबोली. कॉम, १६ सप्टेंबर, १९९६ ला सुरू झाले. हे अगोदर कुठल्यातरी सेवादात्याच्या जागेवर होते. दैनिक केसरी हे त्यानंतरचे आणि तेही कुठल्यातरी सेवादात्याच्या जागेवर होते.

इंटर्नेट वेबॅक मशीन या सेवादात्यावर मायबोलीचे पहिल्या दिवसाचे पान उपलब्ध नाही. पण तिथे उपलब्ध असणारे पान ही १६ सप्टेंबर १९९६ अशी तारीख दाखवते.

प्रत्यक्ष डोमेन घेऊन संकेतस्थळ पाहिले तरी मायबोली. कॉम  सगळ्यात पहिले ठरते (डोमेन नोंदणी      १४ मार्च, १९९७)

दैनिक केसरीचे संकेतस्थळ (डोमेन) खूप नंतरचे आहे ( डोमेन नोंदणी २६ जुलै, १९९९)