मलाही मलाही रंगाचा बेरंग करणारा वाटला. काही ठिकाणी तिची 'पाश्चिमात्य' मनोवृत्ती जरा जास्तच ठळकपणे जाणवते हे मी त्या अर्थानेच लिहिले होते. एकंदरीत पाश्चिमात्त्य लोकांमध्ये पाकिस्तानला झुकते माप देण्याची प्रथा होती. विशेषतः शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर.
पण बेरंग झाल्यासारखे मला वाटण्याने एकूण पुस्तकाच्या दर्जाबद्दल शंका उपस्थित होऊ नये म्हणून मी त्याबद्दल स्पष्ट लिहायचे टाळले. आता आजानुकर्ण यांची प्रतिक्रिया वाचून हा खुलासा करावासा वाटला.
भारतातल्या अनुभवावरचे तिचे वेगळे पुस्तक On a shoestring to Koorg मिळवून वाचायला हवे म्हणजे नक्की काय ते कळेल.