सुरेश कलमाडी यांनी स्थानिक प्रश्न सोडविण्याऐवजी क्रीडाक्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर काम केले आहे म्हणून त्यांच्यावर टीकाही होते. तरीसुध्दा, ते काम करतात याबद्दल कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही.


राष्ट्रकुल स्पर्धेची कामे सुद्धा अंतिम टप्प्यात करण्यामागे नेमका काही तरी उद्येश्य असलाच पाहिजे हे जाणते लोक जाणतात. आता २०२० मध्ये ऑलिंपिकचा धोशा लावला आहे त्यामागे खेळच्या प्रेमापेक्षा पैश्याचे प्रेम आहे असे सर्वसाधारण लोकांचे मत आहे.

माझ्या एका मित्राने सांगितले की त्यांच्या शाळेत प्रवेशासाठी काही लोकांनी अर्ज केला असता, प्रवेशाच्या दिवशी अमूक अमूक रक्कम भरणाऱ्यानीच थांबावे आणि बाकीच्यांनी कलटी मारावी असे सांगितले गेले.

अजित पवार आणि वरील सर्व मंत्रिगण हे आपले भोग आहे आणि ते निमुटपणे सोसायला हवे.