रवींद्र भटांच्या दोन आठवणी :
१. पं. भीमसेन जोश्यांच्या 'अभंगवाणी' ह्या कार्यक्रमात रवींद्र भट निवेदन करीत असत. ज्ञानेश्वर भावंडांसह पायी चालत असताना मुक्तेला तहान लागते, तेव्हा निवृत्ती तिला 'तू तहानच पिऊन टाक' असे सांगतात, त्या प्रसंगाचे वर्णन त्यांनी अतिशय प्रभावीपणे केल्याचे आठवते. अभंगांचे निवेदन ते सुंदर करीतच पण (बाळ माटे इ.) कलावंतांची ओळखही अतिशय रसाळपणे करून देत असत. पुण्यात अभंगवाणीच्या नूमवि प्रशालेच्या प्रांगणात झालेल्या एका कार्यक्रमाला मी गेलो होतो. त्यात सर्व कलावंतांची ओळख करून देऊन झाल्यावर स्वतः पं. भीमसेन जोश्यांनी '... आणि निवेदक रवींद्र भट' अशी त्यांची ओळख करून दिली!
२. पुण्यात स. प. महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवात झालेले कविसंमेलन विसरणे अशक्य आहे. त्यात रवींद्र भटांनी आपल्या एसपीतल्या आठवणी सांगून ' ... आणि आयुष्यात पहिली कविता केली, एसपीच्या ह्या कट्ट्यावरती ... अशी काहीशी कविता म्हटल्याचे स्मरते. (चू. भू. द्या. घ्या.)
रवींद्र भटांना श्रद्धांजली.