मनोगतावर नक्की कोणता फाँट वापरतात हे माहिती नसले तरी तो फाँट या फाँटाशी बराच जवळचा आहे असे वाटते. टाईप केलेले अक्षर कसे दिसावे हे तुम्ही निवडलेला फाँट ठरवतो (टंकनप्रणाली नाही). त्यामुळे तुम्ही इंटरनेट एक्सप्लोरर वापरत असाल तर shift + E दाबल्यास तो खालीलप्रमाणे उमटावा.



मात्र तुम्ही फायरफॉक्स वापरत असाल आणि मनोगताचा फाँट तुमच्या कॉंप्युटरवर उपलब्ध नसेल तर ते अक्षर खालीलप्रमाणे उमटेल




फायरफॉक्स ब्राऊजर हा देवनागरी डायनामिक फाँटांना व्यवस्थित दाखवू शकत नसल्याने ही अडचण येत असावी असे वाटते.

चू.भू.द्या.घ्या.