माझ्या अनेक कवितांमधून या ना त्या कारणाने मारवा येतो. [(किंवा मी तो आणतो :) ]. याबाबतीत कधी कधी अतिरेक होतो की काय़; एकच कल्पना आपण थोडीफार बदलून सगळीकडे अधूनमधून वापरत आहोत की काय, असेही वाटून जाते. आपल्याच कल्पनांची आपणच चोरी करत आहोत, असाही एक विचार मनात तरळून जातो...

काही शब्द, काही कल्पना आणि खरंतर काही Motif-s (मोटिफ - याला मराठीत चांगला प्रतिशब्द मला तरी सापडलेला नाही ) अशी असतात की आपल्या मनात घर करतात. आणि आपण व्यक्त होतो तेव्हा आपला अंश म्हणून ती आपोआपच व्यक्त होतात; एकदा असो वा अनेकदा, ती त्या कवीची पहचान होतात. बा. भ. बोरकरांचा गहिरा निळा रंग, मर्ढेकरांचे उंदीर, तांब्यांचा मधुघट तसा तुमचा हा मारवा!

प्रामाणिकपणे सांगते की मी तुमचं मागचं साहित्य आवर्जून शोधून वाचलेलं नाही पण असं वाटलं तुमची ही कविता आणि हा प्रतिसाद वाचून की तुमच्या कवितेत मारवा अनेक वेळा येत असला तरी दरवेळी तो राग नसेल, पण त्याला एक खास व्यक्तित्व तुमच्या कवितेत नक्कीच असेल. त्या त्या वेळेला तुम्हाला जे महत्त्वाचं म्हणायचं असेल ते म्हणजे मारवा असेल.

कशाला असे प्रश्न पाडून घेता? तुम्ही पुढे जे म्हटलंत तेच खरं!

पण काही काही मोहांपुढे हतबल होण्याशिवाय पर्यायच नसतो. मारवा हा त्यातलाच एक! :)

....अशी हतबलता तुम्हास कायम येवो ही ईश्वराकडे प्रार्थना.....!