रवींद्र भटांना श्रद्धांजली. त्यांना प्रत्यक्ष पाहण्याचा योग कधी आला नाही परंतु इंद्रायणीकाठी, भेदिले शून्यमंडळा, घास घेई पांडुरंगा, सत्यम् शिवम् सुंदरम्, भगीरथ यासारख्या पुस्तकांनी शाळेत असल्यापासून गोडी लावली होती ती आजतागायत. नववीत असताना माझा आवडता लेखक याविषयावर रवींद्र भटांविषयी एक निबंध लिहिल्याचं आठवतंय. तेव्हा वाटायचं किती हे सगळं सुंदर आहे...
मध्यंतरी काही काळ असं वाटायचं की सुंदर असलं तरी काल्पनिक आहे, खोटं आहे! वास्तववादी, दाहक वर्तमानापासून तुटलेलं आहे.
पण मग जाणवायला लागलं- खरं, जुनं, चांगलं याच्या पलीकडे जाऊन संतांना जाणून घेता घेता केलेला "मनासी संवाद" आहे हा. आणि मग पुन्हा माझा आवडता लेखक झाला हा!