"'मिलन' म्हणजे भेट आणि 'मीलन' म्हणजे मिटणे."
- ते हिंदीत. मला वाटते मराठीत ह्या दोन्ही अर्थांसाठी 'मीलन' हा एकच शब्द आहे. दुव्यांमध्ये महेश ह्यांनी
"मिलन = भेट
मीलन = मिटणे"
असे जे म्हटले आहे त्याचा मूळ संदर्भ काय? त्यांनी दिलेला मायबोलीचा दुवा लागत नाही. व्याकरणाच्या/शुद्धलेखनाच्या कोणत्या पुस्तकातून अथवा कोणत्या शब्दकोशातून ही माहिती उद्धृत केलेली आहे ?