'सारेच आत्ममग्न असतात. मनातून जन्माला येणाऱ्या प्रत्येक गोष्टीत 'आत्म' असतोच. माझ्या चित्रांमध्ये असतो, तुझ्या कवितांमध्ये असतो, कोणाच्या सुरात असतोच. तुम्ही स्वतः त्यात असताच. त्याविषयी व्यक्त होताना कोणी प्रथम पुरूषी होतो, कोणी नाही इतकंच. पाठीशी अनुभव नसतील तर ते व्यक्त होणं कृत्रिम ठरत जातं. ती एखादी रचलेली गोष्ट ठरेल... ' त्याचं उत्तर.
काय उत्तर आहे पण. मनाच्या शिळेवर कायम कोरून ठेवायला हवे. खरे म्हणजे हा लेख पुन्हा सावकाश वाचायलाच हवा. नुसतेच उत्स्पूर्तपणे वावा किंवा शीशी करावे असा लेख नाही वाटत हा.
(इतक्या गडबडीत एरवी मी टाईप करायलाही थांबलो नसतो. पण तुमच्या लेखाने मला हे लिहयलाच लवले. कमाल आहे.)