मला वाटतं की आपण रितेशच्या करिअरचा मुद्दा विसरतोय. विलासरावांनी उत्तर भारतियांना नाखुष केलं तर फिल्म इंडस्ट्रीतले अर्ध्याहून अधिक लोक रितेशला आपल्या सिनेमात घेणार नाहीत. अमिताभ बच्चन बरोबर काम करणं वगैरे तर सोडाच. मग रितेश बिचारा काय करेल???
गंभीर मुद्द्याला मी थोडं विनोदाच्या अंगानं नेतेय, पण थोड्या विनोदानं कधीच कोणाचं काही बिघडलं नाही. चूकभूल द्यावी घ्यावी. बाकी मयुरेशशी पूर्णपणे सहमत.