कधी तरी भेटतो जुना मित्र ऐनवेळी...
तशात होतात छान गप्पा... बहार येते !
अगदी अगदी..::):)  फार्फार आवडला.

फिरून मी पाहतो सुखाचा प्रसन्न वाडा...
मध्येच बाहेर दुःख, उघडून दार येते !
फारच अत्युत्तम! दोन ओळींत चित्र आहे, नाट्य आहे, कथा आहे.

कधी कधी राग राग येतो तुझा परंतू...
कधी कधी कीवही तुझी फार फार येते !
वाव्वा.. लहजा फारच आवडला.

धरून तू नेम बैस़; ध्यानात ठेव हेही...
तशी मलाही, करायची तर, शिकार येते !!
अगदी लगेच ठाव घेणारी द्विपदी. भयंकर आवडली.

सगळेच शेर मस्त. गझल अगदी दणदणीत झाली आहे. अभिनंदन!