चुकीच्या मराठीचे काही मस्त नमुने वाचून हसायला मिळेल म्हणून मी इथे आले. पाहते तर काय? 'शब्द'बंबाळ लढाई सुरू! आपण परत थोडे मजेशीर नमुने टाकायला सुरुवात करूया का? ठीक आहे; मीच सुरुवात करते.
मध्यंतरी कुठल्यातरी विम्याच्या जाहिरतीत वाचलेली 'इंग्रजाळलेली' ओळ.
"त्यांच्यासाठी जे तुमची काळजी करतात". (फॉर दोज हू केअर फॉर यू. )
साधं "तुमच्या जिवाभावाच्या माणसांसाठी" असं लिहिलं तर कमी पॉश(! ) होत असेल नाही?