मी शाळेत असताना (न्यू इंग्लिश स्कूल - टिळक रस्ता) त्यांचा व सौ. कुमुद भट यांचा लोकगीतांचा एक अतिशय रंगतदार कार्यक्रम आमच्या शाळेत झाला होता. तो अजूनही चांगलाच आठवतो आहे...
नंतर माझ्या वडिलांबरोबर साहित्य परिषदेच्या कामामुळे त्यांचा जास्त परिचय झाला. झोकून देऊन व मनापासून काम करण्याची त्यांची वृत्ती सगळ्यांच्या नक्कीच स्मरणात राहील.
अलिकडेच त्यांनी आकाशवाणीवरून ऐलतीर पैलतीर कार्यक्रमात काही आठवणी सांगितल्या होत्या. तो कार्यक्रम मी ऐकला होता पण आवडल्याचे त्यांच्यापर्यंत सांगायचे राहूनच गेले...
त्यांना विनम्र श्रद्धांजली...