ही खरंच चांगली बातमी आहे.  मराठीत एका चांगल्या पर्यायी शब्दकोषाची (थेसॉरसची) नक्कीच वानवा होती.  ही उणीव या शब्दकोषाने भरून निघेल असं ही बातमी वाचून वाटतंय.  यशवंत बळवंत पटवर्धन नावाच्या गृहस्थांनी संपादित केलेला 'शब्दकौमुदी' नावाचा एक बराच जुना पण छोटासा शब्दकोष आणि वर उल्लेखलेला मो. वि. भाटवडेकरांचा शब्दकोष मी बऱ्याच वेळेस वापरला आहे.  पण यांना काही मर्यादा आहेत.  मात्र हा नवा येणारा शब्दकोष खऱ्या अर्थाने समृद्ध असेल अशी आशा करूया.