१०० % सहमत. जे व्य्वस्थित योजना आखून असे हल्ले करण्यात यशस्वी होतात त्यांना भेकड म्हणण्यात काय अर्थ आहे? आपले शास्ते, आपली पोलीस यंत्रणा, (आणि हो, स्वतः आपणही) अशा प्रत्येक "भ्याड" हल्ल्यांनंतर ठराविक प्रतिक्रियांची पोपटपंची करणार आणि पुढील हल्ला होईपर्यंत पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. तसेच आता मुंबईच्या "सावरण्या"च्या गप्पा फार झाल्या! एक मुंबईकर म्हणून सांगतो, इथे कोणीही सावरत नाही, केवळ नाईलाज म्हणून दुसऱ्या दिवशी सगळे आपापल्या कामाला लागतात. ह्यात मुंबईचे "स्पिरीट, रेझिलियन्स" इत्यादी काही नसून केवळ निरुपाय असतो. अशा हल्ल्यांची, स्फोटांचीही हळुहळु सवय होते. रोज मरे त्याला कोण रडे ? तेव्हा शाब्दिक 'पाठिंबा'ही नको आणि फुकटचे 'स्पिरिट'चे कौतुकही नको, खास करून राजकारण्यांनी केलेले. त्यांना सांगावेसे वाटते की मदत करू शकत नसाल, हल्ले थांबवू शकत नसाल (किंवा मतपेट्यांच्या राजकारणामुळे तसे करण्याची इच्छा नसेल) तर निदान जखमांवर मिठ तरी चोळू नका!