छान प्रश्न उपस्थित केलायत. सतत पद्धती वापरून जीवनात चालायला लागल्यास वागण्यातील सहजता निघून जाईल का?
ह्याचे उत्तर जरा कठीण आहे. दोन गोष्टी असू शकतात.
१) सतत पद्धती वापरून जीवनात चालायला लागल्यास कालांतराने त्या पद्धती हीच वागण्याची सहज प्रवृत्ती बनू शकते. आणि त्याचा फायदा होऊ शकतो.
शिवाय या पद्धती पद्धती म्हणजे अशा काही जगावेगळ्या नसतात. साध्या साध्या गोष्टी आहेत. तुम्ही समोरच्याचं व्यवस्थित ऐकून घ्यायला शिकलात तर लोक तुमचा आदर करतात, तुमच्याशी सहज बोलतात आणि मैत्री वाढीस लागते. अशी एक सूचना पाहू. हा गुण तुमच्यात आधी नसला आणि पुस्तक पटून तुम्ही तो अंगी बाणवण्याचा प्रयत्न केलात तर चांगलंच आहे की. त्यासाठी थोडेसे कृत्रिम कष्ट घ्यावे लागतील कदाचित पण तो गुण अंगी आल्याने फायदाच आहे. एक स्वानुभव सांगते. मी "फिश" हे पुस्तक वाचलं होतं HR Management आणि Customer Care असा साधारण विषय आहे त्याचा. त्यात सांगितलेल्या एका "मन्त्रा"चा मला उपयोग झाला. तो मंत्र असा : choose your attitude. अभिप्रेत असं होतं की दररोज सकाळी स्वतःला विचारा आज माझा मूड कसा असलेला मला आवडेल? हसरा खेळकर सहज की मख्ख चेहऱ्याचा, खत्रुड? मला आनंद आवडेल का वैताग? आपोआपच दिवसाची सुरुवात छान होईल आणि दिवसही सकारात्मक जाईल. तुमच्या ग्राहकांना तुम्ही समाधान देऊ शकाल वगैरे वगैरे.
खरंतर हे आपल्याला कायमच कळत असतं पण केव्हातरी ते वळायला लागण्यासाठी एक catalyst म्हणून अशा पुस्तकांचा चांगला उपयोग होऊ शकतो.
२) मात्र तो जसाच्या तसा करायला गेलो तर आपण गोत्यात येऊ शकतो. सतत पद्धती वापरून जीवनात चालायला लागल्यास वागण्यातील सहजता निघून जाऊ शकते. आणि कृत्रिम वागणारा म्हणून जोडलेले मित्रही दुरावू शकतात. आणि मिळालेलं यशही साथ सोडू शकतं. त्यामुळे या प्रश्नाचं खरं उत्तर एकच- विवेक पाहिजे.