द्वारकानाथजी, हा हिंदू मुस्लिम वाद नाही. तुम्हाला तो कशावरून वाटला? माझ्या मूळ प्रकटनात तसा उल्लेख आडवळणाने देखील केलेला नाही.
इथे मी मांडलेला मुद्दा असा आहे की अतिरेक्यांना भ्याड, भेकड म्हणून आपण भारतीय फक्त स्वतःचं समाधान करून घेतोय. त्याला जे चोख प्रत्युत्तर द्यायला हवं ते आपण देत नाही. आणि राजकारणी लोक किती उथळ प्रतिक्रिया देतात यावरून त्यांची (अ)योग्यता कशी दिसते हा दुसरा मुद्दा आहे.
दहशतवादाला उत्तर शांतता हे असेल तर आत्तापर्यंत भारतातून दहशतवाद समूळ संपायला हवा होता. कारण आपण कायम शांतच असतो! तेव्हा पेटून उठण्याचे दिवस आले आता!