१००% सहमत आहे.
आपला देश सहिष्णू आहे, आपली संस्कृती विवेकी आहे (म्हणजे नेमके काय असेल ते असो) अशा बढाया १५ ऑगस्ट, २६ जानेवारी अशा वेळी भाषणात द्यायला ठीक असतात. सत्य हे आहे की विवेकाच्या बुरख्याखाली आपले राजकारणी नेभळट, बुळे बनले आहेत. दुबळ्यांच्या दयेला काही अर्थ नसतो. इथे आपण स्वतःला दुबळे करून घेतले आहे. आपल्या स्थानिक नेत्यांना एकमेकांशी भांडणातून वेळ नाही.
राष्ट्रीय नेते काय करत आहेत देव जाणे. मनमोहन, शिवराज एकालाही याबद्दल संताप आल्याचे जाणवले नाहीत. बाकीचे नेते कुठे गायब आहेत
त्यांनाच माहित.  (शरदरावजीपंतसाहेब, कलमाडीसाहेब, ठाकरे बंधू कुणी एकाही चॅनेलवर दिसले नाहीत! )
२५ लोक दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस पुरेल इतका दारूगोळा घेऊन एका सार्वभौम देशात प्रवेश करतात, अंधाधुंद गोळीबार करतात आणि आपण काय करतो? दुसऱ्या दिवशी मुंबईकर कसा उभा राहिला याचे गोडवे गाऊन परत आपल्या कामाला लागतो. एका देशाच्या सीमेत शस्त्रास्त्रे घेऊन प्रवेश करणे हा हल्ला नाही, हे युद्ध आहे. 
वी ऑल गेट द वॉर वी डिझर्व. हे घडले कारण तीच आपली लायकी आहे. वी आर जस्ट स्टुपिड कॉमन मेन!
हॅम्लेट