आमच्या एका उत्तर भारतीय शेजाऱ्यांकडे मी एकदा कौतुकाने पुरणपोळ्या पाठवल्या. मग लक्षात आलं की ते कदाचित पुरणपोळी प्रथमच खात असतील म्हणून मी त्यांना फोन केला. फोन त्यांच्या मुलीने घेतला. तिला मी सांगितले की ही पोळी भरपूर तुपाशी  किंवा दुधाशी खा. तर ती म्हणाली आंटी, हमने बटरके साथ खायी. बढिया लगी! तेव्हापासून मी आमचे स्नेही, शेजारी अमराठी असतील तर त्यांना पुरणपोळी देत नाही!