निःसंशय! कारण हे २५-३० निशस्त्र आले आणि अचानक लोकांना चोपू लागले तर समजू शकेल परंतु सशस्त्र मारेकरी जेव्हा म्हातारे-कोतारे, बायका, मुले न बघता बेसावध लोकांना ओलीस धरत असतील तर भेकड तेच आहेत. शूर अद्यापही आमनेसामने लढतात असाच माझा ग्रह आहे.

माझेही असेच मत आहे.

बाकी राजकारण गेले चुलीत. विशेषतः विद्वेषाचे राजकारण. कणखर व्हायला हवे. पण त्याचबरोबर कुठल्याहीप्रकारच्या विद्वेषालाही, विद्वेषाच्या राजकारणालाही पूर्णपणे नाकारायला हवे. आणि हो राजकारणी आमच्यातूनच येतात. पैसे खाणारे, कर्तव्य न बजावणारे अधिकारीही.