अरे! कोण भेकड? २५-३० जण येऊन शेकडोंना संपवून जातात ते? जगातल्या दुसऱ्या सर्वोत्तम पोलिस यंत्रणेला आणि सर्वोत्तम सैन्याला गुंगारा देत २-२ दिवस जेरीस आणतात ते? पोलिसांचीच वाहनं पळवून चौखूर उधळतात आणि मुंबईबाहेरच्यांच्या उरात धडकी भरवतात ते? वारंवार देशाच्या तळागाळात कुठेही कधीही कशीही दहशत पसरवू शकतात ते? हे भेकड आहेत?
हा परिच्छेद वाचून संताप झाला.... असे कोणी लिहूच कसे शकते.. या परिच्छेदाबद्दल निषेध!!!..
हे भेकड आहेत?
अफकोर्स .. ते आतंकवादी भेकड नाहित तर काय शूर म्हणायचे त्यांना? निशःस्त्र नागरीकांवर अंदाधूद गोळीबारी करणारे तर भेकड आहेतच.. त्यांना शस्त्रपुरवठा करणारे देश तर त्याहूनही भेकड आहेत!!! दम असेल तर सेनेशी लढून दाखवा म्हणावं
बाकी लेखातील भावनेशी / मतितार्थाशी मात्र सहमत..
-(सुपातला)ऋषिकेश