किती लाचार आहोत आपण...
आपल्या सारखी सर्व सामान्य जनता असे प्ततिसाद लिहीण्या पलीकडे काहीच करु शकते. आपल्यासारख्यांच्या मताची कोणाला काडीचीही किंमत नाही.... मग आपल्याला काय वाटतंय हे राहुदे बाजुला!!
आपली आठवण फक्त या राजकरण्यांना वोटींगला येते. मग आपल्या हिताच्या फुटकळ गोष्टी हे करतात. मग खुर्चा पकडण्याचा खेळ सुरू होतो. एकदा का खुर्ची मिळाली.... सगळी जनता गेली चुलीत...! चार पैशासाठी ही माणसं कुठल्याही थराला जाउ शकतात.
स्वतः मजेत हे माजोरे राहतात आणि आम्ही मात्र फासाला लटकतोय...यावर उपाय काय तर शुन्य!
आता हे दहशतवादी.... हे दहशतवादी म्हणजे रोजची डोक्यावर टांगती तलवार आहे. कुणाच्या मुंड्या कधी चीत होतील हे सांगता येणार नाही. मग तुम्ही पुण्यात बसा, मुंबईत बसा नाहीतर आणखी कुठे मरण अटळ!
देशप्रेम का काय तो फक्त आपल्यासाख्यांनाच ... इथे या राजकारण्यांनी तर देशाला कधीच विकलेय त्याचं काय?