कारण दिवस दिवस (की महिना महिना, की अजून काही) ते लोक येथे राहतात आणि आम्हांला पत्ताही लागत नाही. खरंच आपण इतके मूर्ख बनू शकतो? की हा सारा प्रकार आमच्या भौतिक (शस्त्रे, संप्रेषण, वाहतूक इ. ) मर्यादांमुळे घडू शकतो. तसे असेल तर १८५७ च्या अपयशाची कारणे फक्त पेपरमध्ये लिहिण्यापुरतीच म्हणायची. इतिहासातून आम्ही काहीही शिकू शकत नाही, मग इतिहासाची पुनरावृत्ती होणार नाही तर वेगळे काय होईल. एक दहशतवादी म्हणे ओलिसाचे कपडे घालून पळून गेला. शिवाजी महाराज आग्र्यातून पळून जाताना जे तत्त्व वापरतात, तेच बहुतांशी या दहशतवाद्याने वापरले. ज्या ओलिसाचे कपडे जबरदस्तीने काढून घेतले गेले असतील, त्याला तरी कशी नावे ठेवायची. शेवटी आमच्या जाणिवेलाही मर्यादा असतात.