एका प्रकारची आत्यंतिक विकृती, निश्चित. निर्ढावलेपणा, हलकटपणा, क्रूरता, होय, म्हणता येईल. Criminal bent of mind? अर्थात. भेकडपणा? असेलही कदाचित, पण मला दाट शंका आहे.
प्रत्येक विकृतीमागे अस्वीकृती, भीती दडलेली असते आणि जेव्हा प्रश्न सामोपचाराने समोरासमोर सोडवता येत नाहीत तेव्हा विकृती जन्माला येते. पर्यायाने, अशा कृतींमागे भेकडपणाच असतो याबाबत सूतमात्र शंका नाही. शूरांना हलकटपणा, माज इ. दाखवायची गरज नसते याची जाणीव सर्वांना असू देत.
आपल्याला भेकड म्हटले जाईल या भीतीपोटी असे मारेकरी एक तर स्वतः निःशस्त्र होऊन येतील किंवा ज्यांचा बळी करायचा त्यांना प्रथम शस्त्रे वाटतील असे वाटत नाही.
मला वाटतं माझ्या प्रतिसादाचा अर्थ आपल्याला कळलेला नाही. जाऊ दे. या मुद्द्यावर चर्चा करण्याजोगे काही नाही. नि:शस्त्र जनतेवर हल्ला म्हणून हे भेकडपणाच्या व्याख्येत बसत असेलही कदाचित - एवढेच वाक्य महत्त्वाचे आहे.
मारेकऱ्यांचे समर्थन नाही. त्यांनी जे काही केले त्यात शौर्य होते असे तर मुळीच म्हणायचे नाही. केवळ त्यांना 'भेकड' किंवा इतर कोणतीही विशेषणे लावणे हे फोल आहे एवढेच म्हणायचे आहे. ते भेकड आहेत अथवा नाहीत हा एक अत्यंत गौण प्रश्न आहे.
मग भेकड कोण ते तरी सांगून टाकावे? करकरे? कामटे? साळस्कर? मनमोहनसिंग, देशमुख, राजलक्ष्मी भोसले? कारण पोलीसी यंत्रणा सोडून द्या पण राजकारण्यांना कोणत्याही प्रकारचे स्पेशल ट्रेनिंग दिलेले नसते की अशावेळी त्यांनी काय करावे. तेही त्यांना जे सुचेल ते करत राहतात. चूक की बरोबर हा वेगळा प्रश्न. राजलक्ष्मी भोसल्यांनी काय म्हटले त्याने कोणाला काडीचा फरक पडत नाही परंतु त्यावरून राजकारणी भेकड आहेत असे सुचवणे किंवा अशा मोक्याच्या वेळी आपल्याच लोकांना भेकड म्हणत "अरे! भेकड कोण!" अशा चर्चा सुरू करणे नेमके कोणाचे समर्थन करतात ते मला अद्यापही कळलेले नाही.
हे असे याप्रमाणे होत असते तर खरेच स्पृहणीय झाले असते पण दुर्दैवाने आता तसे होणे नाही; तशी अपेक्षा करणे फोल आहे. यापुढे हे असेच होत जायचे.
हे वाक्य भारतीय सैन्यासाठी आणि जे कमांडो आपल्या जिवाची पर्वा न करता मुख्य दाराने आत शिरले, छतावरून उतरले त्यांनाही लागू असल्यास अतिशय निषेधार्ह आहे. शूर अद्यापही समोरासमोर लढतात मग तो पाकिस्तानी सैनिक असो की भारतीय.