लेखातील काही विचार पटले, तर काही नाही, तरी एक मुख्य प्रश्न अनुत्तरित राहिला असे वाटते.

दहशतवादी गटाने हल्ल्यासाठी मुंबईची निवड का करावी? सामान्य माणसांच्या गर्दीची ठिकाणे टाळून उच्चभ्रू ठिकाणे का निवडावीत?

भारत देशाच्या आर्थिक परिस्थितीवर, व्यापारावर वाईट परिणाम होण्यासाठी हे एक त्यातल्या त्यात पटणारे उत्तर. तरी त्यासाठी आयुष्य उधळणारे लोक कोण असावेत?