दहशतवादी गटाने हल्ल्यासाठी मुंबईची निवड का करावी? सामान्य माणसांच्या गर्दीची ठिकाणे टाळून उच्चभ्रू ठिकाणे का निवडावीत?

मलाही हाच प्रश्न आहे. हल्ल्याचा मुख्य उद्देश भारतातील अमेरिकी आणि ब्रिटीश पर्यटकांना आणि पर्यायाने तुमचे नागरिक तुमच्या देशाबाहेर सुरक्षित नाहीत आणि भारतात तर नाहीतच नाहीत हे दाखविणे हा होता? की अमेरिका आणि ब्रिटनमध्ये हल्ले चढवणे तुलनेने अवघड वाटल्याने/झाल्याने त्यांच्या नागरिकांवर इतरत्र, आणि त्यातल्यात्यात भ्रष्टाचाराने पोखरलेला भारत सोपा म्हणून भारतात हल्ले झाले? मग परदेशी नागरिकांवर हल्ले करताना भारताच्या परराष्ट्रीय धोरणांना सुरुंग लागला तर तेही हवेच हा दुय्यम हेतू? परदेशी नागरिकांवर हल्ला हा मुख्य हेतू असल्यास मुंबईची निवड साहजिक आहे.