निःसंशय! कारण हे २५-३० निशस्त्र आले आणि अचानक लोकांना चोपू लागले तर समजू शकेल परंतु सशस्त्र मारेकरी जेव्हा म्हातारे-कोतारे, बायका, मुले न बघता बेसावध लोकांना ओलीस धरत असतील तर भेकड तेच आहेत. शूर अद्यापही आमनेसामने लढतात असाच माझा ग्रह आहे.

हे आपले म्हणणे आहे, याचा अर्थ असा तर नाही ना की जे निःशस्त्रपणे केवळ बाहुबलावर आणि समोरासमोर रणांगणात लढतात ते शूर? शत्रू गाफील असताना अचानक कमी पण जिवावर उदार होऊन लढणाऱ्या मनुष्यबळानिशी त्याच्यावर चाल करणं हे एक महत्त्वाचं युद्धतंत्र आहे.

दुसऱ्या महायुद्धाचे/ अमेरिका इराक युद्धाची उदाहरणे पाहा. सामान्य निःशस्त्र लोकांवर विमानातून/जमिनीवरून बाँबहल्ले ही खूप वेळा केलेली गोष्ट आहे. अगदी हिरोशिमा नागासाकी तरी वेगळे काय होते? आधुनिक युद्धतंत्र हे सेनेपुरते मर्यादित नाही. हे सत्य आपण स्वीकारल्यावाचून गत्यंतर नाही.

असो. अतिरेकी शूर आहेत असे म्हणणे हे या चर्चा प्रस्तावाचे उद्दिष्ट नव्हते. मुद्दा असा आहे की भेकड हल्ले म्हणून निकालात काढण्यासारखे हे हल्ले नाहीत. या हल्लेखोरांना भेकड म्हणून आपण आपल्या शत्रूला जोखण्यात चूक करीत आहोत. त्याला underestimate करत आहोत. स्वतःला अधिक गाफील करत आहोत. हे योग्य नव्हे. आत्मघातकी पथकांनिशी आपल्याच घरात घुसून उघड उघड पुकारलेले हे युद्ध आहे. हे सत्य आपण जितक्या लवकर स्वीकारू तितक्या लवकर हे युद्ध आपण जिंकू शकू. आणि दुसरे असे की खरे भेकड आहेत ते राजकारणी; जे नुसते बोलबच्चनगिरी करतात पण प्रत्यक्ष मात्र काही करत नाहीत स्वतःची सुरक्षा व्यवस्था वाढवण्याशिवाय!

सैन्याला गुंगारा द्यायला सैन्य मुंबईची यंत्रणा पाहत नाही. सैन्याला पाचारण करावे लागते. सैन्य येऊन परिस्थिती हाताळेपर्यंत वेळ लागू शकतो. दहशतवाद्यांनी जसा प्लॅन आखलेला असतो तसा सैन्याने त्याक्षणी तो आखलेला असेलच असे नाही.

हे आपले म्हणणे खरे आहे. मात्र वेळ येताच सैन्याच्या योजना जितक्या गतीने बनू शकतात त्याला तोड नाही. या योजना शत्रूच्या योजनेची चांगलीच पायमल्ली करतात. याचे उदाहरण वारंवार दिसते. परंतु या खेपेस प्रसारमाध्यमांच्या कृपेने त्या योजनांची अंमलबजावणी देखील जरा  अवघड होऊन बसली. शत्रूने आपले सारे कच्चे दुवे कसे ओळखले आहेत पहा. त्यांना सैन्याच्या हालचाली योगायोगाने ताजमधील टी. व्ही. पाहून नाही कळल्या. त्यांनी स्वतःचे टी. व्ही. आणले होते! असो प्रसारमाध्यमांविषयी चर्चा वेगळी करू. पण मुद्दा हा की या की ना त्या कारणाने सेनेलाही अपेक्षेपेक्षा जास्त झुंजावे लागले. शत्रूने सेनेला गुंगारा दिला ह्या वाक्याचा अर्थ असा होता. त्यात आपल्या सैन्याला कमी लेखण्याचा जराही उद्देश नाही. तसे कोणास वाटले असेल तर मी जाहीर क्षमा मागते.

अशावेळी मुंबईचे लोक तात्काळ रस्त्यावर उतरून मदत करतात, अन्न पुरवतात, आसऱ्यासाठी आपली घरे उघडतात, रक्तदान करतात त्याला मी खचितच मुंबई स्पिरिट म्हणेन.

१००% सहमत!

(विषयांतर वाटलेला भाग वगळला. : प्रशासक)