लेख माहितीपूर्ण आणि चांगले विश्लेषण करणारा झाला आहे.
मृदुला,
दहशतवादी गटाने हल्ल्यासाठी मुंबईची निवड का करावी? सामान्य माणसांच्या गर्दीची ठिकाणे टाळून उच्चभ्रू ठिकाणे का निवडावीत? भारत देशाच्या आर्थिक परिस्थितीवर, व्यापारावर वाईट परिणाम होण्यासाठी हे एक त्यातल्या त्यात पटणारे उत्तर. तरी त्यासाठी आयुष्य उधळणारे लोक कोण असावेत?
हा हल्ला केवळ उच्च्भ्रू ठिकाणांवर झालेला नाही ही एक गोष्ट. तो दुहेरी होता. सी. एस. टी. स्थानकावर झालेला गोळीबर हा सामान्य जनतेवरच झालेला होता. पण ताज-ओबेरॉय वर झालेल्या हल्ल्यांचा अर्थ खास आहे हे नक्की. मला जे वाटते ते असे:
१) आजवर झालेले हल्ले हे तुलनेने क्षणिक होते. हा हला दीर्घ होता. तो दीर्घकाळ चालवायला पोषक जागा होती. ओलीस ठेवायला मोठा वाव होता. त्यांच्या कृतीला मोठे ग्लॅमर मिळणार होते.
२) आपण म्हटल्याप्रमाणे आर्थिक कारण तर आहेच. जोवर उद्योगमहर्षींना झटके बसत नाहीत तोवर खऱ्या अर्थाने दहशतवादाचे मार्केटिंग होत नाही हे वास्तव आहे. त्यामुळे बड्यांना धक्का देऊन आपले अस्तित्व जोरकसपणे जाणवून देण्याचा हा प्रयत्न (प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट) आहे.
३) वरदा यांच्या खालील म्हणण्याप्रमणे परदेशी नागरिकांनाही लक्ष्य केले असेल.
हल्ल्याचा मुख्य उद्देश भारतातील अमेरिकी आणि ब्रिटीश पर्यटकांना आणि पर्यायाने तुमचे नागरिक तुमच्या देशाबाहेर सुरक्षित नाहीत आणि भारतात तर नाहीतच नाहीत हे दाखविणे हा होता? की अमेरिका आणि ब्रिटनमध्ये हल्ले चढवणे तुलनेने अवघड वाटल्याने/झाल्याने त्यांच्या नागरिकांवर इतरत्र, आणि त्यातल्यात्यात भ्रष्टाचाराने पोखरलेला भारत सोपा म्हणून भारतात हल्ले झाले? मग परदेशी नागरिकांवर हल्ले करताना भारताच्या परराष्ट्रीय धोरणांना सुरुंग लागला तर तेही हवेच हा दुय्यम हेतू? परदेशी नागरिकांवर हल्ला हा मुख्य हेतू असल्यास मुंबईची निवड साहजिक आहे.
यातून भारताला मार्ग काढण्याच्या दृष्टीने फायदा होऊ शकतो. जगाच्या नकाशावर आपली प्रतिमा सुधारू शकते. आण्विक अधिकार वाढवता येऊ शकतात. प्रकाशयुद्ध झालेच तर साहाय्य मिळू शकते.