लेख अतिशय चांगला आहे आणि तुमचे बरेचसे मुद्दे पटले. काही छोट्या मुद्द्यांबद्दल माझे विचार थोडे वेगळे आहेत पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे हा लेख नक्कीच थोडा वेगळा आणि जास्त व्यापक विचार करायला उद्युक्त करील यात शंकाच नाही.
पण त्याच बरोबर हा लेख एवढा थिअरॉटिकल करण्यापेक्षा अजून थोडा स्पेसिफिक (दोन्ही शब्दांना मराठी शब्द न सुचल्यामुळे) केला असतात तर आताच्या परिस्थितीत ते जास्त वाचनीय ठरलं असतं असं वाटतं. म्हणजे उदाहरणा दाखल -
प्रतिस्पर्ध्याची राजकीय उद्दिष्ट्ये संपवण्याऐवजी त्यामागील कारणांचा नायनाट करणे हे खरे राजकीय उद्दिष्ट्य अशा कोणत्याही युद्धामागे असले पाहिजे...
असं म्हणताना दहशतवादी संघटनांची तुमच्या मते उद्दिष्टं आणि त्यामागची कारणं (म्हणजे कदाचित स्वतंत्र काश्मिरची मागणी?) याचं थोडं विवेचन वाचायला आवडलं असतं. किंवा
तसे करावयाचे झाले तर आमूलाग्र धोरणबदल हा एकमेव पर्याय संबंधित सर्व घटकांपुढे येतो. इथेच खरी गोम आहे. कारण असा आमूलाग्र धोरणबदल केवळ राजकीय आघाडीवर होऊन चालणार नाही. त्यामागे सांस्कृतीक, आर्थीक यासारख्या जीवनाच्या इतर क्षेत्रांचाही विचार आवश्यक ठरतो.
म्हणजे काय? काही उदाहरणं (म्हणजे कदाचित पाकिस्तानशी संपूर्ण आर्थिक असहकार? ) दिलीत तर समजण्यास सोपं जाईल.