शत्रू गाफील असताना त्याच्यावर चाल करणं ही निश्चितच युद्धनिती आहे आणि ती यापूर्वीही अनेकांनी अवलंबिली आहे परंतु जर हल्ले सैन्यावर असतील तर त्याला युद्धनिती म्हटले जाते. लहान मुले, बायका आणि सामान्य नागरिक यांच्यावर केलेले हल्ले हे भेकडच आहेत. ती युद्धनिती नाही, फक्त दहशतनिती आहे. पर्ल हार्बर आणि हिरोशिमा नागासाकीसारखे हल्ले भविष्यात घडू नयेत यासाठीच सर्व प्रयत्नशील असतात आणि हिरोशिमावर हल्ला केला होता म्हणून आम्हीही तसेच करतो असे सांगण्याची हिम्मत आता कोणाची नसावी आणि इतिहासाला काळीमा फासणारी अशी ती उदाहरणे आहेत. त्याचे युद्धतंत्र म्हणून समर्थन होऊ शकत नाही.
तेव्हा, हो शौर्य हे समोरासमोर, जाहीर लढण्यात आहे. निरपराधांना ओलीस ठेवणे हे भेकडपणाचे लक्षण आहे.
अर्थात, त्यांना भेकड म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे असे नाही किंवा असे प्रसंग येतातच असे म्हणण्याचा हेतू नाही परंतु बिकट परिस्थितीतही नकळत का होईना दहशतवाद्यांचे ग्लोरिफिकेशन नको.
राजकारण्यांबाबत मात्र सर्व खरे आहे, ते भेकड आहेत, ते बेजबाबदार आहेत, भ्रष्टाचारी आहेत आणि आम्हीच निवडून दिलेले आहेत.