आपले हिंदी चांगले व्हायची अतिशय गरज आहे तीन कारणांसाठी - १) प्रसिद्धिमाध्यमे, संसद अश्या
ठिकाणी आपली बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी २) केंद्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांमध्ये हिंदीभाषक व
हिंदी विषय घेतलेल्यांना प्राधान्य मिळते म्हणून ३) माझ्यासारख्या भाषा क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला
मराठीपेक्षा हिंदीभाषेत काम मिळण्याची शक्यता नेहेमीच कैकपटीने जास्त असते उदा. कंपन्यांची
माहितीपुस्तके, जाहिराती इ.
हिंदी भाषेवर प्रभुत्व असेल तर प्रचंड प्रमाणात कामे मिळतात म्हणून तरी हिंदीभाषेचा गांभीर्याने अभ्यास
करायला काहीच हरकत नाही.
उगाचच हिंदीभाषक व हिंदीभाषा ह्यांचा द्वेष करण्यात काय हशील? एकतर हिंदीभाषेत उत्तमोत्तम
साहित्य आहे त्याचा पण आस्वाद घेता येईल किंवा केवळ व्यावहारिक फायदा अश्या दृष्टिकोनातून पण
ह्याकडे पाहता येईल.
________________________________________________
केसरी बाना सजाएँ, वीर का शृँगार कर । ले चले हम राष्ट्रनौका को भँवर के पार कर ।। धृ ।।
(अतिरिक्त इतरभाषिक मजकूर वगळला. मनोगतावर लिहिताना इतरभाषिक मजकुराचे प्रमाण १०% च्या आत राहील असे पाहावे. : प्रशासक)