भारतापुरते बोलायचे झाले तर काश्मीरची मागणी मान्य झाली तर भारतातील दहशतवाद थांबेल का?
काश्मीरचा मुद्दा घेऊन असणारा दहशतवाद थांबेल. कारण उद्दिष्ट्य संपले तर अनुयायी मिळवणे शक्य होणार नाही. अनुयायी मिळाले नाहीत तर संघटन नाही. अर्थात, ही शक्यता आहे. प्रश्न पूर्ण कधीच सुटत नसतो. ती एक प्रक्रिया असते.
भारत अमेरिकेशी संबध ठेवून आहे म्हणून त्याचे परिणाम काश्मीर प्रश्न सुटला तरी भारताला भोगावे लागतील?
येथेच आमूलाग्र धोरणबदलाचा माझा मुद्दा येतो.
इथे मला असे वाटते की अमेरिकेशी असलेले आर्थिक हितसंबंध लक्षात घेता आपल्याला त्यांच्यापासून दूर जाता यायचे नाही. (जागतिकीकरणाच्या धोरणाचा एक परिणाम बहुधा दहशतवाद हाही आहे.) त्यामुळे धोरणबदल असा काही होईल का - काही समजत नाही.
माझा तोच प्रश्न आहे लेखाच्या शेवटी मांडलेला. या घडीला तर मला त्याचे उत्तर दिसत नाही. होकारार्थी नाही किंवा नकारार्थीही नाही. म्हणून मी असेही म्हणतोय की, समग्रपणे या प्रश्नाकडे पाहिले जात नाही ही आत्ताची स्थिती आहे.
दुसरा एक प्रश्न असा - ९/११ नंतर अमेरिकेवर एकही हल्ला झाली नाही हे कसे? की हे अमेरिकन सरकार, गुप्तचर यंत्रणा यांचे यश म्हणायचे?
बऱ्याच प्रमाणात हे तथ्य आहे. ९/११ नंतर अमेरिकेने जी सुरक्षा व्यवस्था केली तिचे हे यश आहे. त्यामुळेच त्यानंतर अमेरिकेच्या जगभरातील हितसंबंधांना लक्ष्य करण्यात आले. त्यात उद्दिष्ट्य तेच - त्या देशाला जेरीस आणण्याचे. मुख्य भूमी सुरक्षित, पण विखुरलेले हितसंबंध असुरक्षित अशी ही स्थिती आहे.